Ad will apear here
Next
रत्नाकर मतकरी
खेकडा, कळकीचे बाळ यांसारख्या एकाहून एक उच्च दर्जाच्या गूढकथा लिहिणारे आणि लोककथा ७८, प्रेमकहाणी, आरण्यक, चार दिवस प्रेमाचे यांसारखी सरस प्रयोगशील नाटकं लिहिणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.........
१७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईत जन्मलेले रत्नाकर मतकरी हे गूढकथा, भयकथा, नाटकं, बालनाट्य आणि संगीतिका लिहून प्रचंड लोकप्रिय असणारे लेखक आणि मराठी रंगभूमीवरचे एक श्रेष्ठ नाटककार, दिग्दर्शक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या संस्थेतून कामं करून दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, अजय वढावकर, सुप्रिया मतकरी अशा अनेक कलाकारांनी पुढे रंगभूमी गाजवली.

त्यांनी वयाच्या १७व्या वर्षीच लिहिलेली ‘वेडी माणसं’ ही एकांकिका ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून प्रसारित झाली होती. आजपावेतो त्यांची एकूण ८९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याशिवाय जवळपास चाळीसेक पुस्तकं अप्रकाशित स्वरूपात आहेत.  

लोककथा ७८, दुभंग, जावई माझा भला, अश्वमेध, घर तिघांचे हवे, चार दिवस प्रेमाचे, अजून यौवनात मी, खोल खोल पाणी, करता करविता, चि. सौ. कां. चंपा गोवेकर, जादू तेरी नजर, प्रियतमा, शूss कुठं बोलायचं नाही, स्पर्श अमृताचा, साटंलोटं, आरण्यक, इंदिरा, एकदा पहावं करून, माझं काय चुकलं, अशी मोठ्यांची नाटकं आणि अचाट गावची अफाट मावशी, अलबत्या गलबत्या, निम्माशिम्मा राक्षस, सरदार वाकडोजी फाकडे, इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी, धडपडे, बडबडे, मारकुटे आणि कंपनी अशी त्यांची बालनाट्यं प्रचंड गाजली.

ऐक टोले पडताहेत, अंश, अंतर्बाह्य, बारा पस्तीस, गहिरे पाणी, इन्व्हेस्टमेंट, माणसाच्या गोष्टी, मृत्युंजयी, निजधाम, परदेशी, संभ्रमाच्या लाटा, संदेह, अपरात्र, एक दिवा विझताना, फाशी बखळ, जौळ, कबंध, खेकडा असे त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय आहेत. 

त्यांनी आपल्याच ‘संगीत प्रेमकहाणी’ नाटकावर बेतलेली ‘बेरीज वजाबाकी’ ही मराठी मालिका आणि ‘गहिरे पाणी’ ही गूढकथांवर आधारित मालिका प्रचंड गाजली होती. मुंबई दूरदर्शनवर गाजलेल्या ‘गजरा’ कार्यक्रमात त्यांचं मोठं योगदान होतं. 

त्यांना अखिल भारतीय मराठी परिषद, नाट्यदर्पण, अत्रे फाउंडेशन, संगीत नाटक अकादमी अशा अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. 

१७ मे २०२० रोजी त्यांचे करोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.

(रत्नाकर मतकरी यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. रत्नाकर मतकरी यांच्या तारकर या कथेचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZVJCG
Similar Posts
जॉर्ज कॉफ्मन दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा लेखक-दिग्दर्शक असलेला आणि सहकाऱ्यांच्या साथीने लिहिलेल्या तब्बल ४५ नाटकांपैकी बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरण्याचे भाग्य लाभलेला अमेरिकेचा तुफान लोकप्रिय नाटककार जॉर्ज कॉफ्मनचा १६ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याच्याविषयी
शिरीष पै, सुहास शिरवळकर केवळ तीन ओळींमध्ये आशय आणि भावना मांडण्याचा ‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठीत रुजवणाऱ्या शिरीष पै, ‘दुनियादारी’ या जबरदस्त कादंबरीने अवघ्या तरुणाईला भुरळ पाडणारे सुहास शिरवळकर आणि समाजभूषण चरित्रकार पुरुषोत्तम पांडुरंग गोखले यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय
आनंद अंतरकर आपले वडील अनंत अंतरकर यांच्या पश्चात ‘हंस’सारख्या मासिकाच्या संपादनाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि स्वतः उत्तम लेखन करणाऱ्या आनंद अंतरकर यांचा १८ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language